शिक्षणाधिकाऱ्यांपुढेच शिक्षकांमध्ये फ्रिस्टाईल

पोलिसांत गुन्हा दाखल : सेवाज्येष्ठाचा निर्णयाच्या सुनावणीदरम्यान झाला वाद

पुणे – जिल्हा परिषदेच्या ह. ब. गिरमे महाविद्यालयातील मुख्याध्यापकपदासाठी शिक्षणाधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आलेल्या सेवाज्येष्ठता निर्णयाच्या सुनावणीदरम्यान दोन शिक्षकांमध्ये चप्पलने मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

याप्रकरणी मधुकर दामोदर बहुले (वय 50, रा. रुम नं. 25, घोरपडे पेठ, पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात मारहाणीसह गुन्हा दाखल केला आहे. सोमवार (दि. 27) रोजी जुन्या जिल्हा परिषद इमारतीतील शिक्षणाधिकारी कार्यालयात हा प्रकार घडला. पुणे जिल्हा परिषदेच्या ह.ब.गिरमे महाविदयालयातील मुख्याध्यापक पदाच्या सेवाजेष्ठतेच्या निर्णयासाठी सोमवारी सुनावणीकरिता बहुले आणि आणखी एक जणाला माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात बोलविण्यात आले होते.

दरम्यान, दोघांनी बहुले यांना जातीवाचक बोलुन “तु हेड मास्तर पदाचा नाद करु नको’ असे बोलून बहुले यांना खाली पाडून लाथाबुक्‍यांनी चप्पलने मारहाण केली. कार्यालयाच्या बाहेर ढकलून देण्याचा प्रयत्न करून “तुझा कायमचा काटा काढतो’ अशी धमकी दिली. याप्रकरणामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली असून बहुले यांनी पोलीस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

“त्या’ शिक्षक म्हणावे का?
प्रत्यक्षात शिक्षणधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू असताना आरोपी दोन्ही शिक्षकांनी भांडणे सुरू केली. त्यांना आपण कुठे आहोत, कुणासमोर बसलो आहोत याविषयी गांभीर्य नसल्याचे त्यांच्या भांडणावरून दिसून येत होते. याशिवाय एकमेकांवर मोठमोठ्या आवाजात आरोप करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे, हातवारे करुन भांडण करणे असे प्रकार त्याठिकाणी सुरु होते. रस्त्यावरील गुंडमवाली ज्यापध्दतीने भांडणे करतात त्याप्रमाणे दोन शिक्षक आपआपसांत भांडण करीत होते.

शिक्षकी पेशाला काळीमा
शिक्षकाला समाजात आदर्श मानले जाते. उत्तम शिक्षण देऊन आदर्श नागरिक तयार करावेत त्यातून देशाची प्रगती व्हावी याचा वसा आणि वारसा सांगणारा व्यवसाय म्हणून शिक्षकीपेक्षाकडे पाहिले जाते. मात्र, भवताली घडणाऱ्या काही घटनांमुळे शिक्षकांमधील चांगुलपणा आणि सामाजिक भान हरपत चालले आहे का? असा प्रश्‍न जुन्या जिल्हा परिषद इमारतीमध्ये घडलेल्या घटनेवरुन समोर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)