चिंबळी- मरकळ (ता. खेड) येथे रेंशनिग दुकानात मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले असल्याचे पोलीस पाटील बाळासाहेब टाकळकर यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदूळ देण्याचे जाहीर केले असल्याने मरकळ येथे शनिवारी (दि 17) सकाळी 9 वाजल्यापासून रेशन दुकानामध्ये मोफत तांदूळ वाटप सुरू करण्यात आले आहे. तर ग्रामपंचायतीच्या वतीने घरोघरी जाऊन हात धुण्यासाठी दोन-दोन साबण वाटप करण्यात आले. यावेळी तलाठी एम. आर. ठाकूर, सरपंच स्मिता लोखंडे, उपसरपंच लाला लोखंडे, रोहीदास लोखंडे, सचिन लोखंडे उपस्थित होते.