रोहित पवारांच्या संकल्पनेतुन मोफत ‘पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण’

मतदारसंघातील युवक-युवतींसाठी अनोखा उपक्रम

जामखेड – आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित कर्जत-जामखेड मतदार संघातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी ऑनलाइन ‘पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण’ घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडुन राज्य पोलीस दलात १२ हजार ५३८ जागांची भरती करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण केली जाणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले असुन संबंधित अधिकारी वर्गाला त्याबाबत सुचनाही दिल्या आहेत.पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवक युवतींसाठी आघाडी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असुन राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड तालुक्यातील युवक-युवतींना ही मोफत संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

या पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणात लेखी परिक्षा व शारीरिक क्षमता चाचणी अशी तयारी करून घेण्यात येणार आहे.लॉकडाउनच्या काळात लेखी परीक्षेतील मराठी, अंक गणित,बुद्धिमत्ता चाचणी तसेच सामान्य ज्ञान या विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राज्यातील तज्ञ मंडळी हे मार्गदर्शन करणार आहेत.या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित युवक-युवतींनी आपली नोंदणी करणे अनिवार्य असुन https://bit.ly/2fuz2P G या लिंकवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे किंवा उपलब्ध करण्यात आलेल्या QR CODE वरूनही नोंदणी करता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.