लस येण्यापूर्वीच बुकिंग सुरू

ब्रिटनने आरक्षित केले 190 दशलक्ष डोस

पॅरिस – करोनावरील लस विकसित करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी चाचण्या सुरू आहेत. त्यातच आता बातमी आली आहे की, अमेरिकेपाठोपाठ ब्रिटननेही एका तयार होत असलेल्या लशीचे 190 दशलक्ष डोस म्हणजे एकोणीस  कोटी डोस आरक्षित केले आहेत. फ्रान्स- ऑस्ट्रियाई कंपनी वालनेवाची ही लस आहे. या कंपनीनेच स्वत: ही माहिती दिली आहे. 

या कंपनीची लस तयार होण्याच्या अगोदरच जुलै महिन्यात ब्रिटनने 60 दशलक्ष म्हणजे सहा कोटी  डोस आरक्षित किंवा बुक केले आहेत. दोन टप्प्यात दिल्या जाणाऱ्या या लशीच्या डिसेंबर महिन्यात चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर चाचण्या यशस्वी झाल्या तर 2021 च्या दुसऱ्या सहामाहीत लस उपलब्ध होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

ब्रिटनला 2021 मध्ये पहिल्या टप्प्यात 60 दशलक्ष डोस उपलब्ध केले जाणार आहेत. त्याकरता 470 दशलक्ष युरो अर्थात 557 दशलक्ष डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. अमेरिकेनेही एका लशीचे सुरवातीचे सगळे डोस विकत घेण्याचा करार अगोदरच केला असल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिध्द झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.