पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 14व्या वित्तीय आयोगाच्या निधी मधून अल्पभूधारक महिला शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे यांचे वाटप सरपंच बबनराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून गावातील 50 अल्प भूधारक महिला शेतकऱ्यांची यादी महसूल विभागाच्या वतीने तयार करण्यात आली.
त्यानुसार संबंधित महिला यांना 1 गोणी यूरिया, 1 गोणी सुपर फॉस्फेट व 1 किलो मका बियाणे यांचे मोफत वाटप करण्यात आले, असे ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच किरण ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवडे, दत्ताराम वैद, सुनंदा ढोबळे, विठ्ठल ढोबळे, नानासाहेब ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.