मुंबई – जिओ कंपनीने आऊटगोईंग कॉल वर चार्ज आकारण्याची घोषणा करत जिओ ग्राहकांना धक्का दिलाय. जिओ ने त्यांची कॉलिंग पॉलिसी बदलली असून आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सला कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, आता ‘जिओ’ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आणखी एक घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबर 2019 या कालावधी पूर्वी ज्या युजर्सने रिचार्ज केला असेल, त्या युजर्सला आपल्या रिचार्ज कालावधी पर्यंत फ्री कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.
तसेच, 10 ऑक्टोबर नंतर जे युजर्स नवीन रिचार्ज करतील त्यांना मात्र या फ्री कॉलिंगचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जिओ कंपनीने ग्राहकांची समजूत काढल्याचे दिसून येत आहे.
An important update for all Jio users. pic.twitter.com/TR04y92wmC
— Reliance Jio (@reliancejio) October 10, 2019