जुन्नर/ नारायणगाव/ बेल्हे -जुन्नर तालुक्यात शनिवारी (दि. 4) दिवसभरात बल्लाळवाडी, आळेफाटा व नारायणगाव येथे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील संख्या 82 वर पोहोचली आहे. त्यातील 45 जणांनी कोरोनावावर मात केली असून, 35 जण उपचार घेत आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 4) लेण्याद्री येथे 16 संशयितांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहे.
दरम्यान आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात काम करणारा वॉर्डबॉयचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा प्रशासन शोध घेत आहे. हा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील गावनिहाय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : बल्लाळवाडी- 5, शिरोली खुर्द- 4, उंब्रज (नं.1)- 4, निरगुडे- 3, पिंपळवंडी- 3, खानगाव- 2 नारायणगाव- 2, आळेफाटा, वारूळवाडी, धनगरवाडी, उंब्रज नंबर दोन, ओतूर, पिंपळगाव जोगा, जुन्नर, पिंपळगाव-आर्वी, नेतवड, उंचखडक-राजुरी, संतवाडी-आळे, बोरी बुद्रुक येथे प्रत्येकी एक रुग्ण.