मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ किती आमदार गेले आणि किती राहिले हीच चर्चा सुरू होती. दुसरीकडे भाजपने या प्रकरणापासून दूर राहणे पसंत केले. त्यातच आता आमदारांना शिंदे गटात सामील होण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले गेलेत, अशा चर्चा सुरू असताना शिवसेना आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत वगळता, सर्व आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याकडे कायम असून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
आमदार राजपूत म्हणाले की, शिंदे गटात सामिल होण्यासाठी ५० कोटींहून अधिकची ऑफर दिली असल्याचा गौफ्यस्फोट शिवसेना राजपूत यांनी केला आहे. दोन चारचाकी भरून पैसे आले होते, त्याचे फुटेज आपल्याकडे असल्याचा दावा आमदार राजपूत यांनी केला आहे.
दरम्यान आपल्याला १०० कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असही त्यांनी म्हटलं. राजपूत यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधातील बंडाला नवे वळण मिळणार अशी शक्यता आहे.