यवत – जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने यवतकरांचा निरोप घेत वरवंडकडे प्रस्थान केले.यावेळी न्यु अंबिका कला केंद्र चौफुला (वाखारी) येथे घुंगराचा छनछनाट अन् टाळ मृदुंगाचा नादासोबत लावणी आणि भक्तीगीतांचा मिलाप आज तुकोबांच्या पालखीत पाहायला मिळाला.
कला आणि भक्तीच्या संगमात आज केडगाव-चौफुला बहरुन गेला.भक्तीमय वातावरणात आज वारकऱ्यांना भक्ती आणि लावणीच्या जुगलबंदी याची देही याची डोळा अनुभवायला मिळाला.
जगतगुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी येथील अंबिका कला केंद्राच्या कलाकरांनी पारंपारिक वेशभुषासह वारकऱ्यांचे व पालखीचे स्वागत केले यावेळी नर्तिकांनी आपली कला सादर केली.विठुरायाच्या भक्ती गीतांवर टाळ धरला सोबतच लावणीही सादर करत जुगलबंदीचा एक नजराणा वारकऱ्यांसाठी सादर केला.
या जुगलबंदीमुळे या वारकऱ्यांचा थकवाच दूर झाला.यावेळी कला केंद्राचे संचालक अशोक जाधव व कलावंतांच्या वतीने १० हजार वारकरांऱ्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.