श्रीनगर – काश्मिरातील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांचा आज खात्मा केला. त्या जिल्ह्यातील मेल्होरा भागात हे दहशतवादी आल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर त्यांनी तेथे सर्च ऑपरेशन सुरू केले त्यावेळी ही चकमक झाली. त्यात हे चार दहशतवादी मारले गेले. तेथे अन्यही काहीं दहशतवादी लपून बसले आहेत काय याचा शोध घेतला जात आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जगभर करोनाचे थैमान सुरू असताना दहशतवाद्यांची काश्मीरातील घुसखोरी आणि कारवाया सुरूच असल्याने लष्करानेही दक्षपणे तेथे पहारा सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना नेस्तानबुत करण्यात सुरक्षा दलांना यश येत आहे. ठार झालेले दहशतवादीही पाक प्रशिक्षित दहशतवादी असावेत असा कयास आहे.