जम्मू-काश्मीरमधील चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान 

श्रीनगगर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावेळी दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. अद्याप या भागात शोध मोहीम सुरू आहे.

पुलवामा येथील लस्सीपोरा भागात गुरुवारी संध्याकाळी शोधमोहीम राबवली जात असताना सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. शुक्रवारी पहाटेपर्यंत ही चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.