पुणे – कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूर येथे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. याचा करावा तितका निषेध कमीच आहे. परंतु यापेक्षा चीड आणणारे , संतापजनक विधान भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदीजींनी कर्नाटकच्या या औरंगजेबरुपी मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचून निष्कासित करावे अशा शब्दांत महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणतात, ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणे ही अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे’ महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करायचं दूरच पण या घटनेविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवप्रेमी बांधवांविरुद्ध कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूर येथे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली याचा करावा तितका निषेध कमीच आहे परंतु यापेक्षा चीड आणणारे , संतापजनक विधान भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 18, 2021
काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदीजी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणाले होते की ‘भारताच्या मातीची खासियतच अशी आहे की इथे जर औरंगजेब आला तर त्याला पुरून उरण्यासाठी शिवाजी महाराजच’ उभे राहतात.
त्यामुळे मोदीजींनी कर्नाटकच्या या औरंगजेबरुपी मुख्यमंत्र्याला पदावरून खाली खेचून निष्कासित करावे आणि आपण खरे शिवभक्त आहोत हे संपूर्ण देशाला तसेच महाराष्ट्राला दाखवून द्यावे. अन्यथा बोलाचीच कढी आणि बोललाच भात ही तुमच्याबाबतीत देशभर बनत असेलली प्रतिमा आणखी घट्ट होईल, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.