कोंढवा येथून नायजेरीयन नागरिकाकडून सव्वा 4 लाखाचे कोकेन जप्त

पुणे : कोंढवा येथे एका नायजेरीयन नागरिकाकडून 4 लाख 16 हजाराचे कोकेन जप्त करण्यात आले. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक (1) ने केली आहे. शमशीद्दीन ओमोटाला हसन( 48,रा.सांकला एक्‍सक्‍युझिव्ह व्हिस्टा सोसायटी, पिसोळी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलीस आयुक्तांनी संचारबंदीच्या काळात सुरु असलेले अवैध्य धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पथकाला कार्यवाही करण्यास सांगितले होते.

अंमली पदार्थ विरोधी पथक कोंढवा परिसरात गस्त घालत असताना त्यांना पिसोळी येथील ब्रुक फिल्ड सोसायटी समोर आरोपी हसन हा संशयास्पदरित्या दिसला.त्याला ताब्यात घेतले असता, 52 ग्रॅम कोकेन (4 लाख 16 हजार), पाच मोबाईल, एख दुचाकी, रोख 20 हजार इलेक्‍ट्रॉनिक वजन काटा असा 5 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्‍टनूसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रिनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, सुजित वाडेकर, मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, संदिप जाधव, मनोज साळुंखे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, विशाल दळवी, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.