एफ-4 एसईए चॅम्पियनशिप : स्नेहा शर्माची तिसऱ्या फेरीत आघाडी

चॅंग सर्किट (थायलंड) – भारताची आघाडीची महिला रेसर स्नेहा शर्माने फॉर्म्युला फोर साऊथ आशिया अजिंक्‍यपद स्पर्धेतील तिसऱ्या फेरीतील महिला गटामध्ये आघाडी घेतली. ही स्पर्धा थायलंडच्या चॅंग इंटरनॅशनल सर्किट येथे सुरु आहे. थायलंड येथील राऊंडमध्ये चारही रेसमध्ये स्नेहाने आघाडी घेतली. तिने दहा देशातील अकरा रेसर्समध्ये अव्वल आठमध्ये स्थान मिळवत 1:46:06 सेकंद अशी वेळ नोंदवली.

अठ्‌ठावीस वर्षीय स्नेहा ही व्यवसायाने एअरलाईनमध्ये कॅप्टन आहे. तिला इंडिगो एअरलाईन्स आणि जे के टायर यांचा पाठींबा आहे. तिने फॉर्म्युला फोर रेस कार (टीम मेर्टिअसकडून) पहिल्यांदाच बुरी राम येथे चालवली. तिने चॅम्पियनशिपच्या चारही रेसमध्ये सहभाग नोंदवत 1:46:06 अशी सर्वोत्तम वेळ नोंदवित ओव्हरऑल गटात अव्वल आठ जणांमध्ये स्थान मिळवले. तिच्या गटात त्याने अव्वल स्थान पटकावले. 2019 चॅम्पियनशिपमध्ये तिच्या गटात ती आघाडीवर आहे.

चॅंग सर्किट हे मोटो जीपी रेसिंगसाठी लोकप्रिय आहे. या सर्किटवर वॅलेंटिनो रोसी व मार्क मार्केझ हे सहभागी होते. ही फॉर्म्युला-4ची सिरिजसह फॉर्म्युला थ्री आशिया व ब्लॅंकपेन जीटी सिरीज या आशियातील मोठ्या स्पर्धा आहेत. स्नेहाने रेस 2 मध्ये पोल पोझिशन व रेस 3 मध्ये पी टू स्थान मिळवले. त्याचा फायदा तिला संपूर्ण हंगामात गुण मिळवताना होणार आहे. वर्षातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विजयाने मी उत्साहीत आहे, असे स्नेहा म्हणाली. मला ट्रॅकवर आनंद मिळतो. त्यामुळे मी एकामागोमाग एक रेसमध्ये सहभाग नोंदवत आहे, असेही तिने सांगितले.

इंजिनियर व चालक प्रशिक्षकांचे डाटा ऍनिलिसिस हे जबरदस्त आहे. त्यामुळे मला चांगल्या कामगिरीस मदत मिळाली. रेसमध्ये चांगला शेवट करण्याचा माझा प्रयत्न होता. मला अन्य एका चालकाने टक्कर दिली. त्यामधून सावरत मी गुणांची कमाई केली. त्यामुळे चालकाचे खऱ्या अर्थाने कौशल्य आपल्यास कळाले, असे स्नेहा म्हणाली. फॉर्म्युला फोर एसईए चौथी फेरी थायलंडला 21 जूनपासून सुरु होईल. त्यानंतर त्याचे आणखीन सात फेऱ्या बाकी आहेत. ज्यामधील दोन या जुलैमध्ये भारतात होणार आहेत.

मी पुढच्या रेस विकेंडची वाट पाहत आहे. मी त्याच्या शारीरिक व मानसिकदृष्ट्‌या भक्कम राहण्यावर भर देत आहे. माझ्या गटात आघाडी घेण्याचे माझे लक्ष आहे आणि भारतामध्ये ओव्हरऑल अव्वल पाच जणांमध्ये येण्याचा प्रयत्न असेल, असे स्नेहाने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)