मोदींनी आचारसंहितेचं मोठं उल्लंघन केलं – तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांचा सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार थंडावल्या नंतर, प्रचाराच्या धामधुमीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल केदारनाथ येथे पूजाअर्चेसाठी रवाना झाले होते. मोदी सकाळी 9 ते 9:30च्या सुमारास मोदी केदारनाथ येथे हेलिकॉप्टरद्वारे पोहचले होते. मात्र, प्रचार संपल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी केदारनाथ दौऱ्याचं टीव्हीवर प्रक्षेपण होत असून हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत तृणमूल काँग्रेसने मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तृणमूलने निवडणूक आयोगाला चिठ्ठी लिहून मोदींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन दिवसांपासून केदारनाथ यात्रेला गेले आहेत आणि या दौऱ्याला मीडियामधून प्रचंड प्रसिद्धी दिली जात आहे. शिवाय प्रचारबंद असताना मोदींनी मीडियाशी संवादही साधला आहे. तसेच केदारनाथच्या विकासाच्या मास्टर प्लानचीही घोषणा केली आहे. हे आचारसंहितेचं मोठं उल्लंघन आहे, त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृणमूलने या चिठ्ठीतून केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.