नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग 19 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पंजाबचे त्यांचे निकटवर्तीय 5-6 माजी मंत्रीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासोबतच अमरिंदर यांचा पक्ष पंजाब लोक कॉंग्रेसही भाजपमध्ये विलीन होणार आहे.
पंजाबमध्ये भाजपकडे सध्या फक्त दोन जागा आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक कॉंग्रेस भाजपमध्ये विलीन करण्याबाबतच्या चर्चेला वेग आला, जेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत सुमारे पाऊण तास बैठक घेतली.
कॅप्टन अमरिंदर सिंग बैठकीनंतर बाहेर आले असले तरी पंजाब लोक कॉंग्रेसच्या (पीएलसी) भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रश्न फेटाळून लावत याला केवळ चर्चा असल्याचे म्हटले, अमरिंदर सिंग यांनी 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.
यानंतर कॅप्टन अमरिंदर यांनी ट्विटरवर लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतल्यानंतर पंजाबच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर राज्य आणि देशाच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला, जो आपल्या दोघांसाठी नेहमीच सर्वोपरी आहे आणि राहील.
दरम्यान, भाजप पंजाबमध्ये पक्षाची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे. कारण भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांचा कार्यकाळ संपत आहे. अशा स्थितीत पंजाब लोक कॉंग्रेसचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर पक्ष कॅप्टनच्या निकटवर्तीयांकडे पंजाबमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतो.
हेही वाचा – गौतम अदानी बनले जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती; कमालीच्या वेगाने वाढतेय संपत्ती
लालबागच्या राजाच्या वस्तू लिलावातून मिळाले “इतके’ कोटी रुपये
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’साठी निधी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजीपाला विक्रेत्याशी गैरवर्तन
Bharat Jodo Yatra: देशातील सुशिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात भटकत फिरतोय; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र