नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) प्रमुख नेते प्रकाश सिंग बादल यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने प्रकाश सिंह बादल यांना एक आठवड्यापूर्वी मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाश सिंग बादल यांच्या मृत्यूच्या वृत्ताला त्यांचे पुत्र आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी दुजोरा दिला आहे.
“A great man, king of Punjab”: Mika expresses grief over demise of Parkash Singh Badal
Read @ANI Story | https://t.co/4YisoX8Wfa#MikaSingh #ParkashSinghBadal #Punjab pic.twitter.com/GfCZGtcxtI
— ANI Digital (@ani_digital) April 25, 2023
भटिंडा येथील बादल गावात प्रकाश सिंग बादल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव बुधवारी सकाळी मोहाली येथून बादल गावात आणण्यात येणार आहे.
सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये फोर्टिस रुग्णालयाने म्हटलं होतं की, “प्रकाश सिंग बादल हे आयसीयूमध्ये उपचार घेत असून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली आहेत.” प्रकाश सिंग बादल हे पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री बनले होते.