नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सध्या त्यांच्यावर लाहोरच्या सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच त्यांना त्यांच्या प्रकृति अस्वास्थ्यामुळे जामीन देण्यात आला होता.
नवाज शरिफ यांना चौधरी साखर गिरणी प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आजारपणामुळे त्याला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष असलेल 69 वर्षीय शरीफ यांना सोमवारी रात्री उशिरा लाहोरमधील सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्लेटलेटची संख्या अचानक कोसळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, याच आजावर उपचार सुरू असताना त्यांना ह्दयविकाराचा झटका आला असल्याचे सांगण्यात येत आहे. नवाज शरिफ यांच्या मुलगा हुसेन नवाज यांनी आपल्या वडिलांना तुरूंगात विष देण्यात येत असल्याचा आरोप नुकताच केला होता. भ्रष्टाचार प्रकरणात नवाज लाहोरच्या कोट लखपत कारागृहात बंद होते.