भारतीय “ऑटो इंडस्ट्रीला” आशियातील बड्या बँकरचा इशारा

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था सध्या मंदीच्या छायेतून जात आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत असून अनेकांनी कामगार कमी केलेत तर काहींनी उत्पादन थांबवलं आहे. प्रवाशी वाहनाच्या विक्रीमध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. या पार्शवभूमीवर आशियातील सर्वात श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी भारतीय ऑटो इंडस्ट्रीला संरचनात्मक बदल करण्यासाठी तयार होण्याचा इशारा दिला आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या वार्षिक कार्यक्रमात कोटक बोलत होते. यावेळी ते म्हणाले. आता कारच कौतुक संपलं आहे, त्यामुळे गिअर बदलायला हवा. तसेच ‘ग्राहकांची पसंती वेगाने बदलत आहे आणि कार उत्पादकांनी सामायिक गतिशीलतेसाठी तयार असले पाहिजे. ऑटो क्षेत्रात स्ट्रक्चरल आणि फिरत्या समस्या आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी काही आत्मपरीक्षण करणं गरजेच आहे. कारण, या क्षेत्रात अंतर्गत बदल आवश्यक आहेत”. या संदर्भात, उदाहरण देताना आपला मुलगा कार खरेदी करण्याचा विचार करण्यापेक्षा ओला किंवा उबरवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)