पुणे – आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी कॉंग्रेस पक्ष जोमाने तयारीला लागला असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजनबद्ध रितीने लढवल्या जाव्यात, यासाठी प्रदेश कॉंग्रेसने ही व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. समितीच्या उपाध्यक्षपदी यशोमती ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस राजाराम पानगवाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रवीण देशमुख, प्रदेश कॉंग्रेस चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख यांचा समावेश असून गणेश पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे.