बॉलीवूड सुपरस्टार आमीर खान हा सध्या आपल्या आगामी “लालसिंह चड्डा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट अशी आमिर खानची ओळख आहे.
आजपर्यत त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका ही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या आमीर खानचा एक सुंदर अशा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या तो शर्टलेस असल्याचे दिसून येत आहे.
आमीर खानचा हा फोटो सेलेब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटो आमीर सोफ्यावर बसून आपली फिट बॉडी फ्लॉट करताना दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले की, पॅकअप शूटनंतरचा आमीर खान.
खरचं, दिवसेंदिवस तो आणखीनच तरुण आणि कुल बनत आहे. हा फोटो पाहिल्यास आमीर हा 55 वर्षांचा आहे, यावर विश्वासच बसत नाही. हातात सिगरेट पाइप घेतलेला आमीर खूपच हॅंडसम आणि कूल वाटतो.
हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून त्याच्यावर चाहत्यांच्या असंख्य कमेंटस् येत आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास आमीर खान सध्या आपल्या “लालसिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करिना कपूर-खान झळकणार आहे.