नवी दिल्ली – लाखो कार्यकर्ते व चाहत्यांच्या उपस्थितीत माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना बुधवारी दुपारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी 4 वाजताच्या सुमारास सुषमा स्वराज यांच्यावर दिल्लीतील लोधी रोड स्माशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुषमा स्वराज यांची कन्या बांसुरी कौशल यांनी पार्थिवाला मुखाग्नि दिला.
Delhi: Former External Affairs Minister #SushmaSwaraj cremated with state honours at Lodhi Crematorium. pic.twitter.com/bHecwKabao
— ANI (@ANI) August 7, 2019
सुषमा यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्रिमंडळातली मंत्री देखील उपस्थित होते.
Delhi: PM Narendra Modi, Senior BJP leader LK Advani, Vice-President M Venkaiah Naidu and Defence Minister Rajnath Singh at Lodhi Crematorium. #SushmaSwaraj pic.twitter.com/Lnl9KbNo7X
— ANI (@ANI) August 7, 2019
तत्पूर्वी, सुषमा स्वराज यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या जंतंर-मंतर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान त्यांचं पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील भाजप कार्यालयात ठेवण्यात आलं होतं. याठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी याठिकाणी त्यांच अत्यंदर्शन घेत श्रध्दाजंली वाहिली.
भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज काळाच्या पडद्याआड
दरम्यान, माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आलं, यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.