सुषमा स्वराज यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली -माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आलं, यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर सारा देश शोकसागरात बुडाला.

सुषमा स्वराज यांचे पार्थिव दिल्लीतील लोधी रोड स्माशानभूमीत आणले असून याठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक भाजपाचे नेते आणि मंत्री उपस्थित आहेत.

तत्पूर्वी, सुषमा स्वराज यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून त्यांच्या जंतंर-मंतर येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील भाजप कार्यालयात ठेवण्यात आलं होतं. याठिकाणी अनेक राजकीय नेत्यांनी याठिकाणी त्यांच अत्यंदर्शन घेत श्रध्दाजंली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.