भाजपाच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

मुंबई : डहाणूतील भाजपाचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे करोनामुळे निधन झाले आहे. मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये पास्कल धनोरे यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्यानंतर पास्कल धनोरे यांना गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नंतर प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले होते. मात्र उपचारावेळी त्यांचे निधन झाले.

पास्कल धनारे २०१४ ते २०१९ या काळात आमदार होते. पालघरमधील हडाणू मतदारसंघातून ते निवडून आले होते. या काळात राज्यात भाजपा-शिवसेनेचे युती सरकार होते.

करोनाची लागण झाल्यानंतर पास्कल धनारे यांनी गुजरामधील वापी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती खालावल्यानंतर रविवारी रात्री त्यांना मुंबईमध्ये हलवण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पास्कल धनारे यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.