बॉलीवूडमध्ये सध्या अनेक स्पोर्टस ड्रामा चित्रपट साकारण्यात येत आहे. अजय देवगणदेखील लवकरच फुटबॉलवर आधारित असलेल्या “मैदान’ चित्रपटात झळकणार आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक माहिती समोर येत आहे. या चित्रपटात जगभरातील दिग्गज फुटबॉलपटू दाखविण्यात येणार आहे.
“मैदान’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा करत असून ते नुकतेच करोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यामुळे सध्या चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले आहे. अमित शर्मा यांच्या तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर लगेच शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.
अमित शर्मा म्हणाले की, “मैदान’ चित्रपट सर्वोत्कृष्ट करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहे. आम्ही जगभरातील फुटबॉलपटूंना “मैदाना’वर खेळण्यास बोलविले आहे. हे खेळाडू जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि थायलंड आदी देशातून येवून चित्रपटात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.