बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे निधन

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचे आज निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मिश्रा हे मागील काही दिवसांपासून आजारी होते दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. जगन्नाथ मिश्रा तीन वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. त्यांच्या निधनावर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्‍त केला आहे.

1975 मध्ये पहिल्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. त्यानंतर 1980 मध्ये दुसऱ्यांदा आणि 1989 ते 1990 या काळात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले होते. दरम्यान, 1990 मध्ये त्यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून केंद्रात काम केले आहे. दरम्यान, सुरूवातीपासूनच मिश्रा यांना राजकारणाची आवड होती त्यामुळे त्यांनी प्राध्यापकापासून सुरू केलेला प्रवास मुख्यमंत्रीपदा पर्यंत जावून पोहचला होता. दरम्यान, मिश्रा यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×