Former Air Force Chief RKS BHADAURIA BJP । लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल (निवृत्त) आरकेएस भदौरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी हवाई दल प्रमुखांनी आज रविवारी २४ मार्चला पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
RKS भदौरिया सप्टेंबर 2021 मध्ये हवाई दल प्रमुख पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या जागी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांना हवाई दलाचे प्रमुख बनवण्यात आले. भदौरिया 30 सप्टेंबर 2019 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत देशाचे हवाई दल प्रमुख होते.
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बह तहसील येथील RKS भदौरिया रहिवासी आहे. राफेल विमान भारताला मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विमानांसाठी फ्रान्सशी वाटाघाटी करणाऱ्या संघाचे त्यांनी नेतृत्व केले होते.
Former Air Force Chief RKS BHADAURIA BJP । आरकेएस भदौरियाला तिकीट कुठे मिळेल?
भाजप उत्तर प्रदेशातील गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांना तिकीट देऊ शकते. सध्या जनरल व्हीके सिंग हे या जागेवरून भाजपचे खासदार आहे. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी या जागेवरून निवडणूक जिंकली आहे. भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या चार यादीत गाझियाबादमधील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. अशात या जागेवरून आरकेएस भदौरिया यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
हे वाचले का ? अखिलेश यादव रामपूरमधून निवडणूक लढवणार ?