काबूल – अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे (एसीबी) माजी अध्यक्ष अजीजुल्लाह फाजली यांच्याकडेच पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे आली आहेत.
अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी ताबा घेतल्यावर त्यांच्या मंडळात मोठे बदल झाले असून, मंडळातील सर्व महत्त्वाच्या पदांवर तालिबानी समर्थक व्यक्तींचीच नियुक्ती करण्यात आली आहे.
तालिबानची सत्ता आल्यानंतर देशाच्या प्रशासकीय समितीमध्ये ही पहिलीच नवीन नियुक्ती आहे. एसीबीचे माजी अध्यक्ष अजीजुल्लाह फाजली यांची पुन्हा मंडळाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.