Shreya Bugde Post| ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून अभिनेत्री श्रेया बुगडेला मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या विनोदी शैलीमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. याशिवाय श्रेया सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने पती निखिल सेठच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
श्रेया बुगडेने इंस्टाग्रामवर निखिलसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, “तु दुर्लभ व्यक्तिमत्त्व आहेस. फक्त माझा, कायमचा माझा……इतकं निर्मळ अंत:करण कुठे नाही. तु दुसऱ्यांसारखा नाही, तुझा खरेपणा आणि सुरक्षितता तुला एक चांगला माणूस बनवते. तुला आयुष्यभर माझा म्हणण्याइतपत मी भाग्यवान आहे. माझ्या ‘वादळाला’ ‘शांत’ केल्याबद्दल धन्यवाद आणि सर्व ‘शब्दात मांडता येत नाही’ !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निक. माझं तुझ्यावर प्रेम आहे.”
View this post on Instagram
दरम्यान, श्रेयानं 27 डिसेंबर 2015 साली निखिल शेठबरोबर लग्न केलं. श्रेया आणि निखिल यांचे लव्ह मॅरेज असून ‘मांडला दोन घडीचा डाव’ या मालिकेच्या शुटिंग दरम्यान या दोघांची पहिली भेट झाली होती. मागील वर्षी त्यांच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले. एका अथांग समुद्रात यॉटमध्ये रोमँटिक डेटवर जात दोघांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ओपन बोटमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला नवऱ्यानं श्रेयाला हे खास सरप्राइज होते.
दरम्यान, श्रेया अनेकदा इनस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे हटके आणि ग्लॅमरस लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडत असतात. श्रेया बुगडेला ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे एक वेगळी ओळख मिळाली.