नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेल दरवाढीचे सत्र कायम आजही कायम आहे. मात्र, इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर अधिक महाग झाले आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे
माहितीनुसार, तेल कंपन्यांनी आज इंधनाच्या किंमती पुन्हा एकदा वाढविल्या आहेत. पेट्रोलच्या दरात आज कोणीतीही वाढ करण्यात आली नाही. देशभरात डिझेलच्या दरात ४८ पैशांची वाढ झाली आहे. यानुसार, दिल्लीत पेट्रोलच्या किंमती ७९.७६ आणि डिझेल ७९.८८ रुपये प्रति लीटर झाले आहे. या दरवाढीने पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल अधिक महागले आहे. दिल्लीच नाही तर संपूर्ण देशात असे कधीही घडले नव्हते.
दरम्यान, आतापर्यंत दिल्लीतील इंधनावरील स्थानिक कर कमी असल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होते. मात्र मागील महिन्यात दिल्ली सरकारने डिझेलवरील व्हॅट१६.७५ टक्क्यांवरून ३० टक्के केला. तर पेट्रोलवरील व्हॅट २७ टक्क्यांवरून ३० टक्के केला. यामुळे पेट्रोल १.६७ रुपयांनी तर डिझेल थेट ७.१० रुपयांनी महागले होते. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या सलग इंधन दरवाढीने पेट्रोलच्या तुलनेत डिझेल मोठ्या प्रमाणात महाग झाले.