वाल्हे: “महाराष्ट्राहसह देशातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांच्यावर टिका करणाऱ्या गोपीनाथ पडळकरची लायकी, संस्कृती, संस्कार व बुद्धीचे प्रतिबिंब त्याच्या विचारात दिसुन येत आहे, असा घणाघाती हल्ला पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी वाल्हे (ता.पुरंदर) येथे पडळकर यांच्या वक्तव्यावर चढविला.
जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल पंढरपुर येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द उच्चारल्याबद्दल आज वाल्हे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करत मास्क, सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करत पडळकर यांनी केलेल्या
बेताल वक्तव्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.
त्यावेळी प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, पोपट पवार, प्रा.संतोष नवले, गोरख कदम, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे, विद्यार्थी राष्टवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदेश पवार, दिपक कुमठेकर, तानाजी भुजबळ, अभिषेक दुर्गाडे, संतोष दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, दिपक पवार, आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आपल्या वयापेक्षा दुप्पट ज्यांची राजकिय कारकिर्द आहे. अशा पवार साहेबांबद्दल बोलण्यापुर्वी पडळकराने त्यांच्या नेत्यांचा मोदी -शहांचा सल्ला घ्यायला हवा होता.