सातारा, (प्रतिनिधी) – शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणार्या आणि जातवैधता प्रमाणपत्रांसाठी ज्यांनी आपले प्रस्ताव समितीस अद्याप सादर केलेले नाहीत, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव दि. 29 पर्यंत समिती कार्यालयास सादर करावेत.
नोव्हेंबर 2023 पासून ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रांसाठी अर्ज केला आहे; परंतु अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, अथवा प्रकरणे त्रुटीयुक्त आहेत, अशा अर्जदारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात दि. 26 ते 29 दरम्यान आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपल्या प्रकरणांमधील त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य स्वाती इथापे यांनी केले आहे.
———