पिंपरी – कामावर चाललेल्या कामगारांना फोटो काढण्यास सांगितले. मात्र, कंपनीत कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने कामगारांनी फोटो काढण्यासाठी नकार दिला. त्यावरून सहा जणांनी मिळून पाच कामगारांना हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली.
याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री साडेदहा वाजता जे ब्लॉक, एमआयडीसी भोसरी येथे घडली.
महेबूब मकदूम नदाफ (वय 30), हुसेन दादापीर जमादार (वय 29), अमोल सर्जेराव कुऱ्हाडे (वय 27) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्यासह मोहमद नदाफ, जैनोद्दीन नदाफ, शुभम (सर्व रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिवाकरकुमार विजयसिंह ठाकूर (वय 22, रा. गवळीमाथा, भोसरी. मूळ रा. बिहार), निरंजन कुमार सुबोधसिंग, युवराजसिंग विजयकुमार सिंग, सुराजसिंग बल्लूसिंग, रोशनकुमार ललनसिंग अशी जखमींची नावे आहेत. याबाबत दिवाकरकुमार ठाकूर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.