बिलावर : जम्मू-काश्मीरमधील बिलावर जिल्ह्यातील धनू पॅरोल गावात काल झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, १५ जखमींना बिलावर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कौगहून डन्नू पॅरोलला घेऊन जाणारे वाहन सिला येथे खाली आल्यानंतर खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.
या अपघातात सुरुवातीला चार जण ठार झाले तर पाचव्या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.
बंटू, हंसराज, अजित सिंग, अमरू आणि काकू राम अशी मृतांची नावे आहेत. बिलावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.