नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील मंदिरानंतर आता त्यांच्या चाहत्यांनी आणखी एक प्रयोग केला आहे. यावेळी पंतप्रधानांची मूर्ती तयार करण्यात आली आहे पण तो साधीसुधी मूर्ती नसून चक्क सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली आहे. सुरतमधील एका व्यापाऱ्याने ही मूर्ती तयार केली असून सोशल मीडियावर सध्या या मूर्तीची जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे.
नुकतेच गुजरात विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळी भाजपने बहुमताने निवडणूक जिकली होती. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती.18 कॅरेट सोन्यापासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. निवडणुकीत भाजपने 156 जागांवर विजय मिळवला होता. त्या पार्श्वभूमीवर 156 ग्रॅम वजनाची मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती.
*‼️Centre of attraction of people became ‘Golden Modi
The gold statue of PM Narendra Modi was placed at the Bombay Gold Exhibition. The idol of 156 grams of gold has been made by an artist. @narendramodi pic.twitter.com/Uz39wzxs6p— Manish Gupta (@Manish_Rep) January 14, 2023
ज्वेलरी तयार करणाऱ्या राधिका चेन्स कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवला होता. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवला होता. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे, असे राधिका चेन्स कंपनीच्या मालकाने सांगितले. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती चर्चेचा विषय आहे. मूर्तीकारांनी ही मूर्ती विकण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.
मूळचे राजस्थानमधील बोहरा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी चाहता आहे. त्यांना समर्पित करण्यासाठी काहीतरी खास तयार करम्याचा विचार करत होताो. आमच्या कारखान्यात अनेक मूर्त्या तयार केल्या जातात. त्यामुळे मलाही पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती तयार करण्याची आयडिया सूचली. 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला.. या मूर्तीची अद्याप किंमत ठरलेली नाही. तसेच ही मूर्ती अद्याप विकण्याचा कोणताही विचार नाही. ही मूर्ती तयार करण्यासाठी 11 लाख रुपयांच्या सोन्याचा वापर करण्यात आला आहे.