इस्लामाबाद – पाकिस्तानात एकाच दिवशी पाचशे जणांना करोनाची बाधा झाल्याने त्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा आता 3864 इतका झाला आहे. तर मृतांचा आकडा 54 इतका झाला आहे. पाकिस्तानात अंशत: लॉकडाऊन जाहीर झाले आहे. तेथे जमावबंदीसारखे अनेकही उपाययोजण्यात आले आहेत. तथापि तरीही या केसेस वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. करोनाची सर्वाधिक लागण पंजाब प्रांताला झाली आहे.
दरम्यान या रुग्णांना उपचार करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. याच कारणावरून बलुचिस्तान प्रांतातील एका रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावरच कारवाई करीत डॉक्टरांसह दीडशे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. सरकार करोनाचे गंभीर आव्हान अत्यंत ढिसाळपणे हाताळत असल्याची टीका तेथील सर्वोच्च न्यायालयानेही केली आहे.