पुणे – नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपद मिळवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मांडवी बुद्रुक गावात टोळीसह धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुंडाला उत्तमनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून 8 कोयते, सतूर, 4 लोखंडी बांबू, लोखंडी रॉड, चार आलिशान गाड्या असा 71 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
पोलिसांनी यावेळी मोकाच्या गुन्ह्यातील जामीनावर सुटलेला सराईत गुन्हेगार तुषार गोगावले याच्यासह विशाल कोतवाल, विजय पोळेकर, हृषीकेश पाटील आणि चेतन कांबळे यांना अटक केली आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.