‘पानिपत’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई- आशुतोष गोवारीकरने जेंव्हापासून ‘पानिपत’ची घोषणा केली आहे, तेंव्हापासूनच त्याबाबतची उत्सुकता वाढायला लागली आहे. ऐतिहासिक विषयाबरोबरच यामध्ये असलेली तगडी स्टारकास्ट हे देखील या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. ‘पानिपत’मध्ये अभिनेता अर्जुन कपूर, संजय दत्त आणि अभिनेत्री ज़ीनत अमान, क्रिती सेनन हे लीड रोलमध्ये असणार आहेत.

दरम्यान, नुकतंच ‘पानिपत’ चित्रपटाचं ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात आहे. या चित्रपटात अर्जुन कपूरला प्रथमच ऐतिहासिक सिनेमातील ऍक्‍शनपॅक्‍ड रोल मिळाला आहे. 1761 साली अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये पानिपत येथे झालेल्या या ऐतिहासिक युद्धावर बेतलेला हा चित्रपट येत्या 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.