मुंबई : बॉलीवूड चित्रपटांचे निर्माते आणि व्हिनस रेकॉर्डस् अँड टेप्सचे मालक चंपक जैन यांचे गुरूवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.
मैं खिलाडी तू अनाडी आणि जोश यांसारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्याशिवाय, खिलाडी, हलचल, हमराज या चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचे योगदान होते.
व्हिनस ग्रुपची मालकी असणाऱ्या सात जैन बंधूंपैकी चंपक हे एक होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सांताक्रुझमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. चंपक जैन यांच्या अकाली निधनाबद्दल बॉलीवूड कलाकारांनी दु:ख व्यक्त केले.