जामखेड: कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची जामखेड शहरात फटाक्यांची आतषबाजी व ३० जेसीबीव्दारे गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.
कर्जत जामखेड मतदारसंघातुन प्रचंड मतांनी विजयी झाल्यानंतर प्रथमच आमदार रोहित पवार हे मतदाराचे आभार मानण्यासाठी जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान जामखेड शहरात रोहित पवार यांचे आगमन होताच ३० जेसीबीव्दारे गुलाल उधळण्यात आला त्यानंतर जामखेड शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.