आधी कोविशील्डचा डोस, नंतर ५ मिनिटांनी कोवॅक्सीन टोचली; बेजबाबदारपणामुळे महिलेची प्रकृती खालावली

नवी दिल्ली : देशात एकीकडे लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबवण्यात येत आहे. तर आता  दुसरीकडे बिहारची राजधानी पाटणामध्ये  करोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे.  एका महिलेला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन लसी देण्यात आल्या आहेत. ही घटना पुनपुन परिसरामधील एका लसीकरण केंद्रावर घडली आहे.

बुधवारी पुनपुन परिसरामधील एका लसीकरण  केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या एका  महिलेला लसीचे दोन डोस पाच मिनिटांच्या अंतराने देण्यात आले. या  महिलेने ही घटना केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप केला आहे. या महिलेलचे नाव सुनिला देवी  असून यांना पहिला डोस कोविशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सीनचा देण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती सुनिला  यांचा कुटूंबाने सांगितली आहे की,’लसीकरणासाठी जेव्हा सुनिला  लसीकरण केंद्रावर गेली तेव्हा त्यांना अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही डोस वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे होते. सुनिला  यांना पहिला डोस कोविशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सीनचा देण्यात आला.  

यानंतर जेव्हा  आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतर  देखरेखीसाठी लसीकरण केंद्रातून कोणीही आलं नाही. मध्य रात्री जेव्हा त्यांना अशक्तपणा जाणवू लागला त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिला ग्लुकोज दिलं. सुनिला यांच्यासोबत काहीतरी अघटित घडणार नाही, अशी भीती आता त्यांच्या कुटुंबियांना वाटत आहे. सुनिला यांच्या बाबतीत घडलेला प्रकार पाहून ग्रामस्थ धास्तावले आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.