बाबाचा कारनामा! ५ लग्न, ३२ मुलींसोबत चॅटिंग अन् शेवटी भावाच्या पत्नीवर बलात्कार; पत्नीनेच केला ‘असा’ पर्दाफाश

कानपूर :  हिंदी चित्रपटांमध्ये  एक  व्यक्ती अनेक महिलांसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांची फसवणूक करतो मात्र शेवटी त्याचे पितळ उघडे पडतेच…असे अनेक चित्रपट आपण पाहिला असाल…मात्र ही घटना आता सत्यात घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कानपूरच्या किदवई नगर पोलिसांनी एका बाबाला अटक केली आहे.  त्याने एक नाही दोन नाही तर चक्क पाच लग्न केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

किदवई नगर पोलिसांनी पकडलेला बाबा शाहजहांपूर येथील रहिवासी अनुज चेतन कठेरिया आहे. ज्याने आतापर्यंत तब्बल ५ लग्न केली आहेत. इतकचं नाही तर ५ बायकांना लपवून आता तो सहावं लग्न करण्याच्या तयारीत होता. अनुजने त्याचे ४ लग्न सगळ्यांपासून लपवून केले. तर आता तो  श्यामनगर येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत पाचवं लग्न केले होते. मात्र याच पत्नीने पोलिसांसमोर बाबा अनुजचा भांडाफोड केला. नाव आणि ओळख बदलून अनुज महिलांसोबत लग्न करत होता.

लग्नाच्या काही दिवसांनंतर त्याने पत्नीचा छळ करण्यास सुरूवात केली. याबाबत ५ व्या पत्नीने मागच्या वर्षी चकेरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. अनुज किदवई परिसरात राहत असल्याने पुन्हा या पत्नीने किदवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. ११ मे रोजी अनुजवर कलम ३७७, ३२३, ३०७ या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी जेव्हा बाबाचा तपास करण्यास सुरुवात केली तेव्हा बाबा अनुज शाहजहांपूर येथे बंजारा बाबा कल्याण सेवा ट्रस्टच्या नावाखाली तंत्रमंत्राचा अड्डा चालवत होता. याठिकाणी समस्येने त्रस्त असलेल्या महिला बाबाकडे मदत मागायला यायच्या तेव्हा तो या महिलांना, युवतींना त्यांच्या जाळ्यात अडकवायचा.

अनुज कठेरिया याने शादी डॉट कॉमवर त्याचा प्रोफाईल बनवून ठेवला आहे. त्यात त्याने स्वत:चे  नाव लकी पांडेय असे लिहिले आहे. पोलिसांच्या चौकशीत अनुज तब्बल ३२ मुलींशी चॅटिंग करत होता. त्याचा रेकॉर्डही मिळाला आहे. काही मुलींना अनुज टीचर असल्याचे सांगत होता तर काहींना हॉटेलचा मालक असल्याची बतावणी करत होता. ८ वी शिक्षण असलेला अनुज स्वत:ला बीएससी पास असल्याचे दाखवत इंग्रजीत चॅटिंग करत होता.

अनुजनं २००५ मध्ये जनपद मैनपुरी येथे राहणाऱ्या युवतीसोबत लग्न केले होते. दुसरं लग्न बरेलीच्या युवतीसोबत २०१० मध्ये केले होते. तिसरं लग्न २०१४ मध्ये औरेया येथे राहणाऱ्या युवतीसोबत केले होते. त्यानंतर तिला सोडले. चौथं लग्न त्याने तिसऱ्या पत्नीच्या बहिणीशी केले. जेव्हा अनुजचं सत्य तिला कळालं तेव्हा तिने आत्महत्या केली. पाचवं लग्न कानपूरच्या श्यामनगरमध्ये राहणाऱ्या युवतीसोबत २०१९ मध्ये केले होते.

अनुजने त्याच्या छोट्या भावालाही सोडले  नाही. छोट्या भावाच्या पत्नीने अनुजविरोधात २०१६ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यात अनुजला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.