पुणे – मागील 14 दिवसांपासून नायडू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना बाधित व्यक्तींची पुन्हा तपासणी केली असता, तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यावर बुधवारी (दि.1) घरी सोडण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात आतापर्यंत 28 रुग्ण दाखल झाले. त्यातील 7 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्यांच्या दोन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडले आहे. त्यामुळे सध्या नायडू रुग्णालयात 21 करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातील आणखीन एका व्यक्तीचा 14 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून, त्याची पहिली तपासणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. तर दुसऱ्यांदा नुमने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत. हीसुद्धा निगेटिव्ह आली तर बुधवारी व्यक्तीला घरी सोडण्यात येणार आहे.