Tamil Nadu – तामिळनाडुतील (Tamil Nadu) या जिल्ह्यात सोमवारी फटाक्यांच्या (Firecracker factory) एका युनिटमध्ये लागलेल्या आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M. K. Stalin) यांनी नऊ जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ही घटना जिल्ह्यातील विरागलूर गावात एका खाजगी युनिटमध्ये घडली असून आगीचे कारण शोधले जात आहे.पाच जखमींना तंजावर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना विशेष वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
राज्यातील एक मंत्री एसएस शिवशंकर आणि सीव्ही गणेशन यांना बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपये, गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि सामान्य जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.