Nobel Prize 2023: क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने क्लॉडिया गोल्डिन यांना अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 2023 चा आर्थिक विज्ञानातील Sveriges Riksbank पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला श्रमिक बाजाराच्या परिणामांबद्दल ज्ञान विकसित करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, क्लॉडिया गोल्डिन हा पुरस्कार जिंकणारी तिसऱ्या महिला आहेत. यापूर्वी सन्मानित करण्यात आलेल्या 92 अर्थशास्त्र पुरस्कार विजेत्यांपैकी केवळ दोन महिलांना हा पुरस्कार देण्यात आला होता. क्लॉडिया गोल्डिन हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
इकॉनॉमिक सायन्सेस पुरस्कार समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन म्हणाले की, श्रमिक बाजारपेठेतील महिलांची भूमिका समाजाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. क्लॉडिया गोल्डिन यांच्या संशोधनाद्वारे, आपण महिलांना अडथळा आणणाऱ्या घटकांबद्दल जाणून घेऊ शकतो आणि भविष्यात या अडथळ्यांवर मात करू शकतो.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Claudia Goldin “for having advanced our understanding of women’s labour market outcomes.”#NobelPrize pic.twitter.com/FRAayC3Jwb— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2023
स्वीडनच्या सेंट्रल बँकेने सुरू केले होते बक्षीस –
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची स्थापना सेंट्रल बँक ऑफ स्वीडनने 1968 मध्ये केली होती आणि आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार औपचारिकपणे दिला जातो. हे बँक ऑफ स्वीडन प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षी हे पारितोषिक फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष बेन बर्नांक, डग्लस डब्ल्यू डायमंड आणि फिलिप डायबविग यांनी जिंकले होते. बँकेच्या अपयशावर त्यांनी संशोधन केले आहे. या संशोधनामुळे 2007-2008 मध्ये अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत झाली होती.
विजेत्याला किती रक्कम मिळते?
डिसेंबरमध्ये ओस्लो आणि स्टॉकहोम येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार दिले जातात. विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 1 दशलक्ष डॉलर्स) रोख बक्षीस आणि 18 कॅरेटचे सुवर्णपदक दिले जाते.