अकोले, (प्रतिनिधी) – अकोले शहरातील संगमनेर रोडवरील राजेंद्र होंडा शोरुमला शॅार्टसर्किटने आग लागून फर्निचरसह लाखों रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाले.
शहरातील संगमनेर रोडवर राजेंद्र होंडा या मोटारसायकल शोरुमला दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान शॅार्टसर्किटने आग लागली. योगेश देशमुख यांना शोरुममधून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी शोरुमचे मॅनेजर यांना फोन करुन कळवले. नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनाही फोन केल्याने त्यांनी तत्काळ नगरपंचायतची अग्निशमन गाडी येऊन आग आटोक्यात आणली. यावेळी स्थानिक नागरिकांनीही मदत करून आग विझवली.
आगीत शोरुमचे लाकडी टेबल, सोफा, प्लॅस्टिक खुर्ची, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईल, मोटारसायकलच्या व इनव्हरटरच्या बॅटऱ्या, मोटारसायकलचे स्पेअरपोर्ट, टायर, ऑईल, रोख रक्कम 55 हजार, लॅपटॉप, फॅन, महत्वाच्या कागदपत्र फाईल, ग्राहकांसाठी असेलेले गिफ्ट घडयाळ, चांदी किचन, कापडी पडदे अशा वस्तू आगीत जळाल्या आहेत. अकोले पोलीस स्टेशनला शोरुमचे व्यवस्थापक विनोद वसंत वाकचौरे यांनी खबर दिली आहे.