रांची :- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरून झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांच्याविरुद्ध रांची येथील कानके पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरांडी यांनी एका फेसबुक पोस्ट मध्ये हेमंत सोरेन आणि शिबु सोरेन यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यावरून झारखंड मुक्ती मोर्चाच्या एका नेत्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
मरांडी यांनी 17 ऑगस्ट रोजी बरहैतच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून सुरू केलेल्या यात्रेदरम्यान केलेल्या भाषणात सोरेन पिता-पुत्र आणि राज्यातील जेएमएम-कॉंग्रेस-आरजेडी सरकारवर हल्लाबोल केला आणि आरोप केला की सोरेन पितापुत्रांनी लूट आणि भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही. बाबुलाल मरांडी यांची नुकतीच झारखंड प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.