रांची (झारखंड) – माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे रांची पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे, आणि त्यांना मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात तपास यंत्रणेपुढे हजर राहण्यास सांगितले आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर अनुसुचित जाती जमातीअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ही तक्रार दाखल केली होती. (Jharkhand: Ranchi police issues notice to ED officials after former CM Soren’s FIR )
रांचीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही संबंधीत ईडी अधिकाऱ्याला नोटीस पाठून चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे. सोरेन यांनी त्यांच्या एफआयआरमध्ये आरोप केला होता की ईडीने त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी २९ जानेवारी रोजी दिल्लीतील शांतीनिकेतन आणि झारखंड भवन येथील त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली. आपण अदिवासी असल्याने आपल्या विरोधात जाणिवपुर्वक त्यांनी कारवाई केल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे.