नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यावर आज रवाना झाल्या. जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांच्या वार्षिक सभा आणि जी 20 संघटनेच्या अर्थमंत्र्यांची परिषद या महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्या उपस्थित राहणार आहेत.
या दौऱ्यात त्यांची अमेरिकचे अर्थमंत्री जॅनेट येलेन यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यावेळी त्या अमेरिकन गुंतवणूकदारांशीही चर्चा करणार आहेत. भारताच्या विकासाच्या यशोगाथेत या गुंतवणूकदारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन ते या गुंतवणूकदारांना करणार आहेत.
भारत यंदा अकरा टक्के विकास दर गाठेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. करोनाच्या काळानंतर नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या वार्षिक सभा सदस्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पहिल्यांदाच होत आहेत.