मुंबई – अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आगामी ‘ताली’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. मालिकेत ही अभिनेत्री ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या श्री गौरी सावंतच्या भूमिकेत दिसत आहे. अश्यातच आज या वेबसिरीजचा ऑफिशल ट्रेलर रिलीज झाला आहे.
ट्रेलरमध्ये गणेश ते गौरी असा प्रवास कराताना अभिनेत्री दिसून येते. पण कथा एवढ्यापुरती मर्यादित नाही. ती बदलाचा एक नवीन पुढाकार देखील घेते आणि ट्रान्सजेंडर्सना त्यांच्या जगण्याचा अधिकार देखील देते.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये गौरी बनलेली सुष्मिता सेन म्हणते, ‘मी गौरी आहे, ही कथा माझ्यासारख्या अनेकांची आहे. कारण ही गौरी देखील एकेकाळी गणेशच होती. ट्रान्सजेंडरला आता समाजात त्याचा हक्क मिळाला आहे, त्याला नवी ओळख मिळाली आहे.
पण एक काळ असा होता की त्यांना समाजात कोणताही दर्जा दिला जात नव्हता. या कथेची सुरुवात शून्यापासून करण्यात आली आहे आणि नंतर ट्रान्सजेंडर्सना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्यासाठी क्रांती कशी घडवून आणली हे दाखवण्यात आले आहे.
ट्रेलरमध्ये सुष्मिताचे संवाद अगदी मनाला भिडणारे आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडेच याचीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटात सुष्मिताने स्वत:ला ज्या पद्धतीने मांडले आहे, त्यासाठी खूप धाडस लागते. अशा परिस्थितीत हा अप्रतिम चित्रपट पाहणे आवश्यक आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी OTT Jio सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.